Header Ads Widget

निवृत्त मुख्य सचिवांची निवडणूक आयुक्तपदी वर्णी

लखनौ : उत्तरप्रदेशचे माजी आयएएस अधिकारी अनुप चंद्र पांडेय यांची काल निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडा यांचा कार्यकाल १२ एप्रिल रोजी संपला. तेव्हापासून निवडणूक आयुक्त हे एक पद रिक्त होते. तीन अधिकारी असलेल्या निवडणूक आयोगाच्या या पॅनेलमध्ये सुशील चंद्रा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत तर राजीव कुमार हे दुसरे निवडणूक आयुक्त आहेत. अनुप चंद्र पांडेय हे नियुक्तीनंतर पुढच्या वर्षी होणार्‍या उत्तरप्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडच्या निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. १९८४च्या बॅचचे वरिष्ठ आयएएस अधिकारी डॉ. अनुप चंद्र पांडेय यांनी यापूर्वी २0१८ मध्ये उत्तरप्रदेशचे मुख्य सचिव म्हणून कार्यभार सांभाळला होता. या पदावरुन ते फेब्रुवारी २0१९ मध्ये नवृत्त होणार होते. मात्र, योगी सरकारने केंद्राच्या परवानगीने त्यांचा कार्यकाल सहा महिन्यांनी वाढवला. ऑगस्ट २0१९ मध्ये नवृत्त होण्याआधी पांडेय उत्तरप्रदेशात इन्फ्रास्ट्रर आणि औद्योगिक विकास आयुक्त म्हणून कार्यरत होते.अनुप चंद्र पांडेय यांनी मेकॅनिकल इंजिनियरींग केले आहे. बी. टेकच्या पदवीसोबतच त्यांना एमबीएची पदवीही प्राप्त झालेली आहे. त्यांनी प्राचीन इतिहास या विषयामध्ये डॉक्टरेट मिळवली आहे. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा कार्यकाल साधारण तीन वर्षांचा असेल. त्यांचा कार्यकाल फेब्रुवारी २0२४मध्ये समाप्त होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या