Header Ads Widget

लोकेश राहुल आणि अथिया शेट्टी इंग्लंडमध्ये एकत्र ?

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री धडाकेबाज फलंदाज के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांच्यात दुरावा निर्माण झाल्याचे वृत्त वार्‍यासारखे पसरले होते. पंजाबी मॉडेल आणि अभिनेत्री सोनम बाजवाने शेअर केलेल्या एका फोटोवर राहुलने कमेंट केल्याने अथिया आणि राहुल यांच्यात ब्रेकअप झाल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. दरम्यान, दोघेही सध्या इंग्लंडमध्ये एकत्र असल्याचे पाहयाला मिळत आहे. अथियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा फोटो शेअर केला आहे. अथियाचा हा ब्लॅक अँड व्हाइट फोटो आहे. हा फोटो पाहिल्यानंतर ती इंग्लंडमध्ये असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. कारण चार दिवसापूर्वी राहुलने एक फोटो आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. दोघांच्याही फोटोमध्ये बॅकग्राऊंड सेम दिसत आहे. दोघांनी प्रेमाची कबुली दिली नसली तरी, या दोघांच्या अफेअरच्या चचेर्ला पुन्हा उत आला आहे. अथिया शेट्टी तिच्या चित्रपटांपेक्षा क्रिकेटर केएल राहुलसोबत असलेल्या रिलेशनशिपमुळे चर्चेत असते. केएल राहुल आणि अथियाने त्यांच्या नात्याविषयी कधीच पुढे येऊन काही सांगितले नाही. तरी, या दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. सध्या भारतीय क्रिकेट टीम ही न्यूझीलंड संघा विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी इंग्लंडला पोहोचली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या