Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कोरोना रुग्णसंख्येमध्ये सातत्याने घट,मात्र गर्दी आणि उत्सवामध्ये वाढ

अमरावती: एकीकडे जिल्ह्य़ात कोरोना बाधित रुग्णांची संख्या कमी होत असुन दुसरीकडे मात्र सांस्कृतीक कार्यक्रम, लग्न समारंभ, राजकीय कार्यक्रमांना उधान आल्याचे दिसुन येत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमनाचा धोका पुन्हा वाढला असुन यावर नियंत्रण न मिळविल्यास भविष्यात जुनेच दिवस परत येण्याची शक्यता नाकारता येत नाही.१४ जुन रोजी जिल्हयात ९0 रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन जिल्हयात आतापर्यत ९५ हजार १५0 रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. ९२ हजार 0१ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असला तरी १ हजार ६२३ रुग्णांवर अदयापही उपचार सुरू आहे.कोरोनामुळे मृत्यु होणार्‍या रुग्णांची संख्या आता रोळावली असुन आज दिवसभर्‍यात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला असुन आतापर्यत १ हजार ६२३ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत. जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन,आरोग्य यंत्रणा आणि सुज्न नागरिकांमुळे जिल्हयात कोरोनारुग्णांची संख्या नियंत्रणात आली.मात्र लॉकडाऊनचे नियम शिथील केल्यानंतर बाजारपेठामध्ये नागरिकांची खरेदीसाठी उसळलेल्या गर्दीचे अदयापर्यत रुग्णमध्ये रुपांतर झाले नसले तरी येणार्‍या काळात रुग्ण वाढीचा आलेख वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच र्मयादित संख्येत कार्यक्रम आटोपण्याचे आदेश असतांना देखिल लग्न समारंभ, उत्सव, राजकीय कार्यक्रम आदिमध्ये र्मयादेपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती दिसुन येते त्यामुळे प्रशासनाने आखुन दिलेल्या नियमांचे उल्लधन तर होत आहे मात्र कोरोना सुक्रमनाचा धोका देखिल वाढत असल्याचे वास्तवदश्री परीस्थितीवरून दिसून येत आहे.१४ जुन रोजी जिल्हा आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार जिल्हयात एकाच दिवशी सर्वाधिक कमी म्हणजेच ९0 रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. परिणामी जिल्हयात आतापर्यत ९५ हजार १५0रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहे. १ हजार ६२३ रुग्ण हे एॅक्टिव्ह असुन ९२ हजार 0१ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.एका रुग्णांचा मृत्यू झाला असुन १ हजार ५२६ रुग्ण हे आतापर्यत कोरोनामुळे दगावले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code