
नवी दिल्ली : कोरोना विषाणूविरोधात लढा देण्यासाठी भारताला लवकरच आणखी एक लस मिळू शकते. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ आदर पुनावाला यांनी अशी आशा व्यक्त केली आहे, की नोव्हाव्हॅक्सची कोव्हाव्हॅक्स ही लस सप्टेंबरपयर्ंत भारतात लाँच होऊ शकते. सध्या देशात सीरमची कोविशिल्ड, भारत बायाटेकची कोव्हॅक्सिन आणि रशियाच्या स्पूतनिक व्ही या लसींचा वापर होत आहे.
अदर पुनावाला म्हणाले, की कोव्हाव्हॅक्सचे ट्रायल पूर्ण होत आले आहेत. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले, की रेग्यलेटरीकडून परवानगी मिळाल्यास कोव्हाव्हॅक्स सप्टेंबरपर्यंत भारतात लाँच होण्याची तयारी होऊ शकते. त्यांनी सांगितले, की भारतात नोव्हाव्हॅक्सच्या या लसीचे ट्रायल नोव्हेंबरपयर्ंत पूर्ण होऊ शकतात. सप्टेंबर २0२0 मध्ये, नोव्हाव्हॅक्सने त्यांची लस सीरम संस्थेबरोबर उत्पादन कराराची घोषणा केली होती. सीरमच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी माहिती दिली, की देशात ट्रायलचा टप्पा पूर्ण होण्यापूर्वीच कंपनी जागतिक आकडेवारीवर आधारित परवान्यासाठी अर्ज करू शकते.
कंपनीने १४ जून रोजी जारी केलेल्या निवेदनात म्हटले होते, की कोविड संसर्गाच्या मध्यम आणि गंभीर प्रकरणांमध्ये लसीमुळे १00 टक्के संरक्षण दिसून आले आहे. या लसीचा एकूण कार्यक्षमता दर ९0.४ टक्के असल्याची माहिती त्यांनी दिली होती. या अभ्यासात अमेरिका आणि मेक्सिकोमधील ११९ वेगवेगळ्या ठिकाणांतील २९ हजार ९६0 लोक सहभागी असल्याचे निवेदनात म्हटले आहे. नुकतेच नीती आयोगाचे सदस्य व्ही के पॉल यांनी नोव्हाव्हॅक्सची लस सीरम इन्स्टिट्यूटमध्ये तयार केली जाईल अशी माहिती दिली होती.
0 टिप्पण्या