Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अनिल देशमुखांच्या घरी 'ईडी'कडून झाडाझडती

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (२५ जून) सक्तवसूली संचालनालयाच्या (ईडी) अधिकार्‍यांनी धडक दिली. नागपूरसह मुंबई येथील निवास्थानी ईडीचे अधिकारी धडकले. मुंबई आणि वरळी येथील निवासस्थानासह नागपूरातील जीपीओ चौकातील निवासस्थानी या धाडी घालण्यात आल्या. १00 कोटीच्या वसुली प्रकरणी सीबीआयने देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केल्यानंतर ई.डी.ने ही देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल केला असून शुक्रवारी साडे नऊ तास चाललेला या कारवाईत ई.डी.ने अनेक कागदपत्रांची पडताळणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गुरुवारी रात्रीच ई.डी.चे पथक नागपूरात दाखल झाले होते. शुक्रवारी स्थानिक ई.डी.च्या सहाय्याने पाच सदस्य असलेल्या पथकाने देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर धाड टाकली. काही दिवसांपूर्वीच ई.डी.च्या तीन पथकांनी देशमुख यांच्याशी संबंधित २ सी.ए. आणि एका कोळसा व्यापार्‍याकडे धाड टाकली होती. त्यानंतर ई.डी.ने देशमुख यांच्याघरी पुन्हा छापा घाल्यामुळे खळबळ उडालीे. यावेळी देशमुख यांच्या जीपीओस्थित निवासस्थानासमोर केंद्रीय सुरक्षा दलाच्या महिला बटालियन सोबत स्थानिक पोलिसांचा तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता.सीताबर्डी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल सबनीस आणि अंबाझरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नरेंद्र हिवरे आणि त्यांचा ताफाही हजर होता. ईडीचे अधिकारी आले तेव्हा अनिल देशमुख घरी उपस्थित नव्हते. देशमुख यांच्या पत्नी, मुलगा ,सुन आणि नातवंड घरी होते. १00 कोटींच्या वुसली प्रकरणात सीबीआयने देशमुख यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी कोलकाता येथील दोन बनावट कंपन्यांचे दस्तोवज सीबीआयच्या हाती लागले होते.या कंपन्यांद्वारे कोटयावधी रूपयांचे व्यवहार झाले झाले असल्याचे तपासात निष्पन्न झाले.त्यानंतर ई.डी.ने याप्रकरणी सक्रीय झाली होती. गत २५ मे ला ईडीच्या तीन पथकांनी शिवाजीनगरातील हरे क ृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवरा ,सदर न्यू कॉलनी येथील समीत आयझ्ॉक आणि जाफरनगर येथील कादरी यांच्याकडे धाड टाकली होती. हे तिघेही अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत. त्यानंतर दोन सीए आणि एका कोळसा व्यापार्‍याच्या घरी देखील धाडी टाकण्यात आल्या होत्या. मुंबईच्या ई.डी. पथकाने नागपुरातही मुंबई सारखीच कारवाई केली. देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तींयांचे मनी लॉन्डरींग घोटाळयाशी काही असलेला संबंध या द्वारे पडताळून पाहण्यात येत आहे. ई.डी.ला त्यांच्या तपासात ४ कोटी रुपयांच्या मनी ट्रेलची माहिती मिळाली असल्याची चर्चा होत आहे. मुंबई येथील १0 बार मालकांनी देशमुख यांना तीन महिन्यांसाठी ४ कोटी रूपयांची रोकड दिली असल्याची माहिती समोर आली होती. मुंबईत देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या चौकटीची सुध्दा तपासणी करण्यात आली. देशमुख यांनी बार मालकांकडून केलेल्या वसूलीची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे. (Images Credit : Loksatta)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code