Recent in Technology

Advertisement

Breaking News

नुसरत जहाँँ पुन्हा सोशल मीडियावर ट्रोल

मुंबई : बंगाली अभिनेत्री आणि तृणमूल काँग्रेसची खासदार नुसरत जहाँ मागच्या काही काळापासून सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. मोडलेले लग्न आणि प्रेग्नन्सी या दोन्ही कारणांमुळे नुसरतच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसते. अशातच आता नुसरतने बेबी बम्प फ्लॉन्ट करत सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचा साधा आणि क्यूट लुक पाहून चाहते तिचे कौतुक करताना दिसत आहेत. नुसरतचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. नुसरतने तिच्या इन्स्टाग्रामवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती बेबी बम्प फ्लॉन्ट करताना दिसत आहे. नुसरतचा हा अंदाज काही चाहत्यांनी पसंत पडला असला तरीही काही युझर्स मात्र तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत आहेत. नुसरत या फोटोंमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. यावेळी मिकी माउस को-ऑर्ड ड्रेस घातला होता. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले, हरवलेल्या पक्ष्याला रस्ता दाखवा. नुसरत जहा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती अनेकदा तिचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना दिसते. काही दिवसांपूर्वीच तिने स्विमिंग पूलमध्ये बेबी बम्प फ्लॉन्ट करत काढलेले फोटो देखील इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. त्याआधी तिने काही फोटो शेअर केले होते. जे खूप व्हायरलही झाले होते. या फोटोंमध्ये पोझ देताना ती बेबी बम्प लपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे बोलले गेले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच नुसरत जहाँने पतीपासून वेगळे झाल्याचे जाहीर करतानाच पती निखिल जैनवर गंभीर आरोप लावले आहेत. निखिलने तिच्या बँक अकाऊंटमधून तिला न सांगता पैसे काढल्याचे तिने म्हटले आहे. तसेच लग्नाबाबत बोलताना नुसरत म्हणाली, आमचे लग्न भारतीय कायद्यानुसार झाले नव्हते. लग्न टर्कीमध्ये झाल्याने ते भारतात अवैध आहे. त्यामुळे आम्ही घटस्फोट घेण्याचा काही प्रश्नच येत नाही. याशिवाय तिने निखिलसोबतचे लग्नाचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलिट केले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code