येक पोरगं झोकानं मायाजोळ यिऊन बसलं
आँनलाईन शिक्षनाचं थोळंसंं ईचारू लागलं
म्हने आँनलाईन शिक्षन लय झाले हो कर्जी
हाताले काम, पोटाले भाकर नाई हो सर्जी
तुमी रोज येता,मंग शाळा का उघळत नाई
येकटेच बसता मोबाईलात लियत काईबाई
लय बोर झालो हो ,घरी काईच गमत नाई
घरचे कावले, डबे खाली, खाले काई नाई
शाळेत रोज शिक्षनाची खिचडी भेटे सर्जी
कोरोनानं शिक्षन अंधारातच दिसते गुर्जी
आँनलाईन शाळा तुमी शिका मनता गुरजी
गरीबाच्या लेकरानं कुठून आनाव फोरजी
गरीबाचे पोरं हे शिक्षन कसं सिकतीलजी
ज्याचेजोळ आयुष्याचं नाई थ्रीजी,फोरजी
आई-बाप मंती पैसा अडका पेरला वावरात
सोया,कापूस निघंल तवा लक्ष्मी येईन घरात
कसंतरी कर्ज काळून घिऊन देला मोबाईल
माय-बाप अळानी,तुमी शिकवना मोबाईल
मायासरखे लय ढब्बू पोरं गावातच फिरते
मने हे शिक्षन आमच्या डोक्स्याऊन जाते
दीवाईपावतर शाळा सुरू होत नाई म्हणते
येक वर्स शिक्षन जाऊदे,जीव प्यारा वाटते
सरकार सर्वाच्याच भल्याचं सांगते सरजी
आपन त्यायचं आईकलं पायजे ना गुरूजी
माजवळ नाई मोबाईल,मी दुस-याचा पयतो
बुळवनार नाई शिक्षन गुर्जी अशी हमी देतो
शोषीतायच्या शिक्षनाचं हू नोय लाँकडाऊन
येवळीच विनंती करतो गुर्जी तुमाले मनातून
- अरुण हरिभाऊ विघ्ने
1 टिप्पण्या