Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

पंतप्रधान देऊ शकतात मराठा आरक्षण

कोल्हापूर: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटेल. पंतप्रधानांनी ठरवले तर काहीही होऊ शकते, अशी प्रतिक्रिया श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी वक्त केली. ते म्हणाले की, सुप्रीम कोर्टात आपल्या विरोधात निकाल लागला आहे. आता त्याच ठिकाणाहून आपण सुरुवात केली पाहिजे. फेरविचार याचिकेत खूप वेळ जाईल, त्यातून काही निष्पन्न होणार नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे. आता केंद्र सरकारने पुढाकार घेतला तरच हा मुद्दा सुटू शकेल. नवीन कायदा आणल्याशिवाय आता काही होणार नाही. इतक्या घटना दुरुस्त्या केल्या मग आता का करत नाही हे समजत नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान यांचे काय मत आहे हे समजले पाहिजे. कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वातील मराठा समाजाच्या या मूक मोर्चात राज्यभरातील मराठा समन्वयक सहभागी झाले होते. कोल्हापुरातील आमदार, खासदारांनीही मूक मोर्चाला उपस्थिती लावली होती. यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपापले मनोगत व्यक्त करताना मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच भूमिका मांडली. उद्या संभाजीराजे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट कोल्हापूर जिल्हय़ाचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावत संभाजीराजेंना मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्याचे आवाहन केले होते. संभाजीराजे यांनी आंदोलनानंतर बोलताना शुक्रवारी मुंबईत मराठा समन्वयकांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे जाहीर केले. मराठा आरक्षणावर कोल्हापुरात खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनात सर्मथकांसह वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासहित जिल्हय़ाचे पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील मानेदेखील उपस्थित होते. यावेळी सर्व लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका मांडत मनोगत व्यक्त केले. दरम्यान या मूक आंदोलनानंतर संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने एक पाऊल पुढे टाकले असताना आपणही एक पाऊल पुढे टाकू असे सांगत त्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. मात्र यावेळी त्यांनी नाशिक, रायगड, अमरावती आणि औरंगाबाद येथील मोर्चे ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, सतेज पाटील, हसन मुश्रीफ यांनी मुंबईत चर्चेला येण्याची चांगली भूमिका घेतली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code