Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

आजपासून पावसाच्या 'आद्रा' नक्षत्राला सुरुवात, नक्षत्राचे वाहन 'कोल्हा'

चांदूरबाजार : पंचांग शास्त्रानुसार ग्रह तार्‍यांवर आधारीत, एकूण १२ नक्षत्रा अंतर्गत पावसाचा अंदाज वर्तविण्यात येतो. यातिल तिसरे नक्षत्र म्हणजेआद्रा नक्षत्र होय.या नक्षत्राला २१जूनच्या मध्यरात्री नंतर,२२ जूनचे पहाटे ५ वाजून ३७ मिनिटांनी सुरुवात झाली आहे. या नक्षत्राचे वाहन कोल्हा असल्यामुळे,या नक्षत्रात पाऊसही कोल्ह्या प्रमाणेच लबाड असण्याचा अंदाज दिसून येतो.काही भागात ढग असूनही वार्‍याचे प्रमाण जास्त असल्याने, पावसाची प्रतिक्षा करावी लागेग.सूर्याच्या नक्षत्रकालिन प्रवेश वेळेतील ग्रह स्थिती नुसार,या नक्षत्रातही पाऊस साधारण असण्याची शक्यता आहे.तथापी बहुतांश भागात या नक्षत्राचा पाऊस, दिलासा देणारा राहील.तसेच पोर्णीमेचे आसपास अर्थात २५ जूनचे दरम्यान, वारा वादळा सह पावसाचे योग आहेत.विशेषत: या नक्षत्राचे तिसरे चरणात,२७ जूनचे नंतर सार्वत्रिक पावसाचे योग आहेत.परंतू हवामान वादळीच असेल. हा पावसाचा अंदाज ग्रह नक्षत्रांच्या अंदाज नुसार,पंचांग शास्त्रज्ञाने वर्तविला आहे.प्रत्यक्ष वातावरणातील बदल व स्थानिक हवामान यामुळे पावसावर परिणाम होऊ शकतो. तरी शेतकर्‍यांनी हवामानाचा शास्त्रीय अंदाज,आपला आजवरचा अनुभव व त्या-त्या ठिकाणी पडलेल्या पावसाच्या अंदाजा नुसार पेरणीचा व इतर कामांचा निर्णय घ्यावा.कोविड केअर सेंटरवरही योगाभ्यास जिल्हा आयुष विभागातर्फे झालेल्या कार्यक्रमात जिल्हा आयुष अधिकारी डॉ. मनिषा सुर्यवंशी योगाबाबत मार्गदर्शन केले. कोविड केअर सेंटर येथेही योगाभ्यासाद्वारे रुग्णांचे मनोबल वाढविण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रे , उपकेंद्रांमध्ये वैद्यकीय अधिकारी ,योगशिक्षक, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका व सेवक यांच्या माध्यमातून योगाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. योगाच्या आधारे शरीर व मनाचे संतुलन साधले जाते. रोगप्रतिकारकशक्ती व मनाची सजगता, एकाग्रता वाढते. व्यक्तिमत्व आनंदी होऊन नातेसंबंध सुधारण्यास मदत होते .शरीराची ऊर्जा वाढते व ताणतणावांचे निरसन होते, असे डॉ. सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code