Recent in Technology

Advertisement

Breaking News

मिताली राजने रचला इतिहास

नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने रविवारी इतिहास रचला आहे. मितालीने यावेळी भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरशी बरोबरी केली आहे. महिला क्रिकेटमध्ये ही गोष्ट आतापयर्ंत कोणालाच करता आलेली नाही. त्याचबरोबर ही गोष्ट साध्य करणारी क्रिकेट विश्‍वात सचिननंतर ती दुसरी क्रिकेटपटू ठरली आहे. मिताली २६ जून १९९९ साली पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. रविवारी एकदिवसीय क्रिकेटमध्ये मितालीने २२ वर्षे पूर्ण केली आहेत. सचिन तेंडुलकरने १८ डिसेंबर १९८९ साली पाकिस्तानविरुद्ध खेळताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर सचिन २२ वर्षे आणि ९१ दिवस आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला. सचिननंतर आता दुसरा क्रमांक मितालीचा येत आहे. कारण एवढी मोठी आंतरराष्ट्रीय कारकिर्द अजून कोणत्याही देशाच्या खेळाडूची नाही. मितालीने आतापयर्ंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १0 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावाही मितालीच्या नावावर आहे. कारण महिलांच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये आतापयर्ंत सहा हजार धावांचा टप्पा कोणालाही गाठता आलेला नाही. पण मितालीने मात्र एकदिवसीय क्रिकेटमध्ये सहा हजार धावांचा टप्पा गाठलेला आहे. त्याचबरोबर गेली २२ वर्षे मिताली भारतीय संघाबरोबर आहे. मिताली आणि झुलानमितालीने भारतीय संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. मितालीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची कामगिरी चांगली झाली होती. पण काळानुरुप मितालीकडून भारताचे कर्णधारपद काढण्यात आले. पण तरी अजूनही मिताली पूर्णपणे फिट असून ती भारतीय संघाचा एक अविभाज्य घटक आहे. मिताली राज आणि झुलान गोस्वामी या दोन भारतीय क्रिकेटपटूंनी आतापर्यंत दमदार कामगिरीच्या जोरावर मैदान गाजवले आहे. आता मितालीने तर सचिन तेंडुलकरशीही बरोबरी केली आहे. पण मिताली सचिनचा हा विक्रम मोडणार का, याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांना असेल. कारण मिताली अजून ३-४ महिने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळली तर तिला सचिन चा विश्‍वविक्रम मोडता येणार आहे. त्याचबरोबर वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त दिवस खेळणारी ती एकमेव क्रिकेटपटू ठरू शकते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code