
अमरावती: कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस अहोरात्र कार्यरत असतात. कोरोना साथीच्या काळात जोखीम पत्करून त्यांनी अनेक जबाबदार्या पार पाडल्या व आताही पार पाडत आहेत. त्यामुळे पोलिस दलाचे अधिक बळकटीकरण करण्याबरोबरच नानाविध दर्जेदार सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी चिखलदरा येथे केले. जिल्हा ग्रामीण पोलिस दलातर्फे चिखलदरा येथील हिरेकन पॉईंट येथे उभारण्यात आलेल्या पोलिस विर्शामगृहाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद््घाटन करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या.
जि. प. समाज कल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा विजया सोमवंशी, पोलिस अधीक्षक डॉ. हरी बालाजी एन., श्वेता के. हरी बालाजी आदी यावेळी उपस्थित होते. पालकमंत्री ठाकूर म्हणाल्या की, जिल्हा पोलिस दलातर्फे पोलिस कर्मचार्यांसाठी पोलिस हेल्थ अँप, क्लब व क्रीडा संकुल, विर्शाम कक्ष, उपाहारगृह, महिलांसाठी स्वतंत्र जीम अशा अनेक उत्तमोत्तम सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. यालाच जोडून चिखलदरा येथील विर्शामगृहाचीही दर्जेदार सुविधा निर्माण झाली आहे. चिखलदर्याच्या लौकिकाला साजेशी अशी ही निर्मिती आहे. पोलिस अधीक्षक हरी बालाजी यांनी धडाडीने या सुविधा अंमलात आणल्या हे निश्चित वाखाणण्यासारखे आहे. त्या पुढे म्हणाल्या की, यापूवीर्ही रक्षादीपसारखा चांगला उपक्रम राबवला गेला. पोलिस कर्मचार्यांवरील महत्त्वाच्या जबाबदार्या, अविश्रांत काम व तणाव पाहता त्यांच्या आरोग्य व मनोबल टिकवून ठेवण्यासाठी असे विविध उपक्रम उपयुक्त ठरतील. अशा अनेकविध उपक्रमांना पोलिस दलाने चालना द्यावी. चांगल्या कामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.
0 टिप्पण्या