Recent in Technology

Advertisement

Breaking News

रोजगारनिर्मितीसाठी मेळघाटात अधिकाधिक उपक्रम राबवा- जिल्हाधिकारी

अमरावती : मेळघाटात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने बचत गटांच्या माध्यमातून अधिकाधिक उपक्रम राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी नुकतेच दिले. जिल्हाधिकार्‍यांनी नुकतेच मेळघाटमधील विविध गावांना भेट देऊन तेथील उपक्रमांची, तसेच आरोग्य यंत्रणेचीही पाहणी केली. यावेळी दिया येथील भेटीदरम्यान ते बोलत होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी उपस्थित होत्या. जिल्हाधिकार्‍यांनी धारणी तालुक्यातील दिया उपसिंचन प्रकल्पास भेट दिली व स्थानिकांकडून विविध बाबींची माहिती घेतली. मेळघाटात रोजगारनिर्मिती बचत गटांच्या साह्याने विविध उपक्रम राबवावेत. नागरिकांना विविध योजनांचा अधिकाधिक लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी दिले. आरोग्य यंत्रणेची पाहणी जिल्हाधिका-यांनी या दौ-यात धारणी येथील उपजिल्हा रुग्णालय व विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली व लसीकरण केंद्रांचीही पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक सामग्रीच्या अनुषंगाने प्रस्ताव द्यावेत. मेळघाट क्षेत्रात संपूर्ण लसीकरणाच्या दृष्टीने लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर होणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव भरीव जनजागृती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. धारणी तालुक्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रामध्ये येत असलेल्या चोपण या अत्यंत दुर्गम गावांमध्ये जिल्हाधिकारी महोदय यांनी भेट देऊन तेथील लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. घरकुल प्रलंबित देयके ,सामाजिक अर्थसहाय्य योजना, रोजगार हमीची कामे याबाबत माहिती घेतली. यावेळी त्यांनी गावक-यांशी व विद्यार्थ्यांशीही संवाद साधवा. श् विज्ञान विषयाची माहिती इंग्रजीत सुबक अक्षरात अचूकपणे मांडणा-या व विषाणूची उत्तम आकृती रेखाटणा-या चोपण येथील एका विद्याथ्यार्चे कौतुक करत त्यांनी या दोन्ही बालकांना पेन भेट दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code