दगडासारख्या मनालाही
प्रेमाने पाझर फुटावे
तथागतला आठऊन
वैर द्वेष विसरून जावे
हवाहवासा सुगंध फुलांचा
तसे इतरांना प्रेम दयावे
माणूस म्हणून माणसाने
आनंदाने एकत्र राहावे
टोचतील खूप काटे प्रवासात
काटयांना त्या हळूवार काढावे
होतील हल्ले अन् लढाया अनेक
लढण्यास नेहमी तत्पर असावे
खूप भेटतील विचारप्रवाह
चांगल्या विचारांना स्वीकारावे
रचली जातील कटकारस्थाने
गनिमी काव्याने उद्ध्वस्त करावे
भरडले जातील गोरगरिब बिचारे
हक्कासाठी संविधान वाचावे
गरूडाप्रमाणे गरूडझेप घेऊन
हिमतीने धैर्याने यश मिळवावे
जीवन हे सुख दुःखाने बनलेले
कडू गोड अनुभव घेत जगावे
जीवनाचे गाणे गात आनंदाने
मरावे परि कीर्ती रूपी उरावे
- अजय बनसोडे
मु.दापेगाव ता. औसा जि. लातूर
8408042349
0 टिप्पण्या