
मुंबई: झी मराठीवरील सा रे ग म प लिटील चॅम्प या शोमुळे अनेक नवोदित गायकांचे भविष्य घडले. या शोमुळे महाराष्ट्राला नाजूक सुरांची मेजवानी अनुभवता आली. झी मराठीचा सा रे ग म प हा अनेकांच्या स्वप्नपूतीर्चा मंच आहे असे म्हंटल तर खोटे ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मोनोरंजन क्षेत्राला दिले आहेत.
सा रे ग म पच्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो १२ वर्षांपूर्वी झालेल्या सा रे ग म प लिटिल चॅम्प्सचा. अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ होती ती म्हणजे कमलेश भडकमकर आणि त्यांचा वादक मित्रांची. या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचर% म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वंशयपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच पण या कार्यक्रमाने या पंचर%ांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. आता जवळपास १२ वर्षांनी सा रे ग म प लिटिल चॅम्प्स पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाचा प्रोमो रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. विशेष म्हणजे यावेळी स्पर्धेत जजेस नसून ज्युरी असणार आहेत, हे ज्युरी दुसरे कोणी नसून आपले पंचर% असणार आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करणार आहे. या पर्वाचे नावीन्य म्हणजे ह्या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही. छोट्या स्पर्धकांवर स्पधेर्तून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसले तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपयर्ंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच ह्या १४ छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापयर्ंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की.
0 टिप्पण्या