
उमरखेड : ढगातुन पडणार्या विजेची माहिती देणारे आयआयटीएम पुणे या संस्थेकडून दामिनी अँप विकसित करण्यात आले असून ढगातून कोसळणार्या विजाची माहिती दामिनी वरून पंधरा ते वीस मिनिट अगोदर मिळू शकणार असल्याने तहसीलदार यांनी तालुक्यातील पोलीस पाटील आणि कोतवाल यांना निर्देश देऊन सदर अँप डाऊनलोड करण्यासंबंधी व नागरिकांना सूचना देण्याबाबत दिशानिर्देश नुकतेच दिले आहेत.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले असून मान्सूनपूर्व पावसाने तालुक्यात हजेरी लावलेलि आहे. शेतकर्यांना व शेतमजुरांना कामानिमित्त व पेरणी च्या कामासाठी शेतात राबावे लागते. ढगातून कोसळणार्या विजा मुळे गेल्या तीन दिवसात जिल्ह्यात चार मृत्यू झालेले असून तालुक्यात सुद्धा एका मृत्यूची नोंद झाली आहे. वीज पडून होणारे मृत्यू रोखण्याकरिता पुणे येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरोलॉजी (आयआयटीएम) या संस्थेकडून दामिनी हे अँप विकसित करण्यात आले असून या अँपच्या माध्यमातून पंधरा ते वीस मिनिटे अगोदर विजांचा कडकडाट कुठे होईल आणि विजा कुठे पडतील याचा अंदाज अँप वर देण्यात येणार असल्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी पोहोचण्यासाठी मदत होणार आहे. तू देशात चाळीस सेन्सर्स बसविण्यात आले आहेत सदर अँप मध्ये अजून नवीन फिचर देऊन विजा पडण्याची निश्चित वेळ सुद्धा उपलब्ध होणार आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना देखील या अँपचा फायदा होणार आहे.
सदर अँप तालुक्यातील ९१ पोलीस पाटील आणि ३५ कोतवालांनी गुगल प्ले स्टोअर मधून त्वरित डाऊनलोड करून घ्यावे व नैसर्गिक आपत्तीच्या काळात पूर येणे, वीज पडणे अशा वेळेस व इतर वेळेस आवश्यकता वाटल्यास आपल्या गावातील नागरिकांना सतर्क करावे, यासोबतच नागरिकांनी देखील हे अँप डाऊनलोड करावे यासाठी तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील पोलीस पाटील आणि कोतवालांना दिशानिर्देश जारी केले आहेत.
0 टिप्पण्या