
घाटंजी : प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेच्या लाभापासून घाटंजी तालुक्यातील घाटी शिवारातील १९८ शेतकरी वंचित असून घाटी हे नावं सदर संकेतस्थळावर नाही त्यामुळे तेथील सर्व शेतकरी या योजनेचे वंचित आहेतच. याकरिता त्यांनी अनेकदा निवेदने दिली मात्र कोणतीही कार्यवाही न करता तत्कालीन कृषी प्रधान एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांचा सदर योजनेसाठी उत्कृष्ट काम केल्यामुळे सत्कार केला गेला. सन्मान फक्त आयुक्तांचा किसान सन्मान निधीपासून वंचित शेतकर्यांचे काय? असा सवाल सामाजिक कार्यकर्ते महेश यांनी केला.
अशीच स्तिथी असेल व प्रशासन स्वताच्या सत्काराची सोय करत असेल तेव्हा याला जबाबदार तरी कोण? राजेश जाधव या घाटी मधील शेतकर्याने एका वर्षापूर्वी याबबत निवेदन देखील दिले होते मात्र त्याला सुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली. स्थानिक प्रशासनाने यात महत्वाचा वाटा घ्यायला हवा होता मात्र त्यांनीच याकडे दुर्लक्ष केले. आज घाटी येथील शेतकरी सर्व योजनांपासून वंचित राहत आहे. अशी खंत देखील पवार यांनी व्यक्त केली. सोबतच हे नाव लवकरात लवकर पोर्टलवर उपलब्ध व्हायला हवे व सर्व प्रलंबित शेतकर्यांना पी.एम. किसान योजनेचे २0१९ पासून आतापर्यत पैसे व इतर सर्व नुकसान भरपाई करून द्यावी अन्यथा आंदोलनासाठी तयार रहावे अशी चेतावनी देखील महेश पवार व समस्त शेतकर्यांनी दिली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार आणि शेतकरी राजेश जाधव, केशव बोंद्रे, पांडुरंग भोयर, कृष्णराव सींगेवार, नामदेव निमनकार, संजय बोंद्रे, अवधूत चौरागडे, विकास फुसे, लक्ष्मण गिरि, अरविंद गोरे, नागोराव सावसाकडे, जाफर इमाम खा पठाण, राजेश ठाकरे, संजय सावसाकडे, गोविंदा साखरकर, माया ताई मंगाम, सुमन कनाके, मधुकर पेटेवार, जुबेर मिया देशमुख, शेखचंद कुरेशी, वासुदेव सिडाम, विष्णु शिंदे, मारुती नखाते, विठ्ठल शेंद्रे, दादाराव उदार, निलेश भूत आणि इतरही शेतकरी उपस्थित होते.
0 टिप्पण्या