
यवतमाळ : पुसद तालुक्यातील सिंगरवाडी धानोरा येथील सेवादास कृषी केंद्रात अनधिकृत खतसाठा असल्याच्या माहितीवरून यवतमाळच्या कृषी पथकाने धाड टाकून २ लाख ५८ हजार रुपये किमतीचे २00 बॅग अवैध खतसाठा जप्त केला. शुक्रवारी सकाळी ११ वाजता ही कारवाई करण्यात आली. कृषी विभागाच्या या धडक कारवाईने ग्रामीण भागातील कृषी केंद्र चालकांचे धाबे दणाणले आहे.
ग्रामीण भागातील शेतकर्यांची कृषी केंद्रचालक बियाणे आणि खतविक्रीमध्ये मोठय़ा प्रमाणात लूट करीत असल्याचे वृत्त दै. लोकशाही वार्तासह अन्य प्रसारमाध्यमामध्ये सुध्दा प्रकाशित होत आहे. यामुळे कृषी विभाग सतर्क झाला असून त्यांनी कारवाईचा सपाटा सुरु केला आहे. काल यवतमाळ शहरातून पांढरकवडाकडे मिनीट्रकद्वारे जाणारे सुमारे १८ लाख रुपयांचे संशयित बियाणे जप्त केले. ही कारवाई पोलिस विभागाने केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून व पेरणी हंगाम सुरू झाल्यापासून जिल्ह्यात बोगस आणि अप्रामाणिक बियाण्यांची विक्री करुन शेतकर्यांना फसवून अवैधरित्या पैसे कमविण्याचा सपाटा कृषी क्षेत्रातीलच व्यापारी मनोवृत्तीच्या धेंडांनी अवलंबिला आहे. काही प्रमाणात त्यांचे हे मनसुबे कृषी व पोलिस विभागाचे अधिकारी कर्मचारी हाणुन पाडत आहे.
सिंगरवाडी येथील सेवादास कृषी केंद्रात किसान गोल्ड नावाचे अहमदाबाद येथील प्रशांत गृपचे २00 बॅग खत कृषी विभागाच्या पथकाने जप्त केले. त्यानंतर कृषी केंद्राचे संचालक राजेश विश्वंभर चव्हाण यांचे लहान भाऊ बंटी विश्वंभर चव्हाण यांच्याकडे सुपूर्त करण्यात आले. जि.प.चे मोहीम अधिकारी राजेंद्र माळोदे, उपविभागीय कृषी अधिकारी पी.जी.नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी एस.आर. धुळधुळे, कृ.अ. एस.के. राठोड, पी.आर. बरडे, पोलिस स्टेशनचे चंदन जाधव, ललिता खंडापे, सिंगरवाडीचे पोलिस पाटील विना चव्हाण, शेतकरी मनीष उत्तम चव्हाण यांच्या समक्ष सेवादास कृषी केंद्रातील अनधिकृत खतांचा पंचनामा करण्यात आला. या खताचे रासायनिक वेिषण करण्याकरिता त्यातील तीन प्रकारचा नमुना अमरावती येथील खत वेिषण प्रयोगशाळेत पाठविण्यात आला.
0 टिप्पण्या