Header Ads Widget

पोस्ट खाते करणार अस्थी विसर्जन! गंगाजलही मिळणार

वाराणसी : काशी, प्रयाग, हरिद्वार आणि गया येथे अस्थी विसर्जन करण्याची सोय टपाल खात्याने उपलब्ध करून दिली आहे. स्पीड पोस्टाने अस्थी पाठविता येणार असून तीर्थक्षेत्री त्याचे विसर्जन तसेच विधी मृताच्या कुटुंबाला लाईव्ह बघता येणार आहे. याशिवाय मृताच्या कुटुंबाला एक बाटली गंगाजलही टपाल खात्याच्या वतीने देण्यात येणार आहे. ओम दिव्यदर्शन संस्थेच्या माध्यमातून हे अस्थी विसर्जन करण्यात येणार आहे. टपाल संचालक व वाराणसी विभागाचे पोस्टमास्तर जनरल कृष्णकुमार यादव यांच्या पुढाकाराने ही योजना सुरू करण्यात आली असून, सध्या प्रायोगिक तत्त्वावर फक्त चारच ठिकाणी ही सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या