Recent in Technology

Advertisement

Breaking News

लसीच्या दोन डोसमधील अंतरावरून वाद विवाद

नवी दिल्ली : लसींच्या दोन डोसवरून अंतर वाढविल्यामुळे वाद निर्माण झाला. अंतर वाढविल्याने त्याचे फायदे होणार आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आरोग्य विभागाने स्पष्टीकरण दिले आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी म्हणजेच १३ मे रोजी केंद्रीय आरोग्य विभागाकडून कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधले अंतर ६ ते ८ आठवड्यावरून १२ ते १६ आठवडे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अनेकांचे दुसरे डोस प्रलंबित राहिले. काही तज्ज्ञांनी या निर्णयावर आक्षेप देखील घेतला. मात्र, केंद्र सरकारने हा निर्णय एनटीएजीआय या तज्ज्ञ वैज्ञानिकांच्या गटाने केलेल्या शिफारशीवरून घेतल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, मंगळवारी याच गटाच्या काही वैज्ञानिकांनी दोन डोसमधले अंतर १२ ते १६ आठवडे करण्याची शिफारस आम्ही केलीच नव्हती. केंद्राने त्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतल्याचा दावा केला आणि खळबळ उडाली. लागलीच आज सकाळी एनटीएजीआयचे प्रमुख एन. के. अरोरा यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना यावर खुलासा केला आहे. अंतर वाढवण्यावर गटामध्ये कोणतीही मतभिन्नता नव्हती, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे या निर्णयावरून आता नवा संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code