Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

घराची भिंत कोसळून मुलगा गंभीर जखमी

तळेगांव शापं : येथील काकडदरा वॉर्ड क्र. ६ मधील रहिवाशी साहेबराव वानखडे यांचे राहते घराची भिंत आज रविवारी सकाळी ९ वाजताचे सुमारास अचानक कोसळल्याने विक्की साहेबराव वानखडे हा जखमी झाला.त्याचे डाव्या हाताला व पायाला जबर इजा झाली. त्याला उपचाराकरिता उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे दाखल करण्यात आले. उपचारानंतर काही वेळातच त्याला सुट्टी देण्यात आली. ११ जूनच्या रात्री वादळी वार्‍यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंतीमध्ये पाणी मुरल्याने भिंत कोसळल्याचे वानखडे यांचे कडुन सांगण्यात आले. त्यांचे अंदाजे ४0 हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी उपसरपंच पप्पू भुयार यांनी भेट दिली व माहिती तलाठी किसन कौरती यांना देण्यात आली. वानखडे यांची परिस्थिती हलाखीची असुन मोलमजुरी करुन ते आपल्या संसाराचा गाढा हाकत आहे. शासनाने आर्थिक मदत करावी अशी साहेबराव वानखडे यांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code