Header Ads Widget

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी

पंढरपूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण १७ ते २५ जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम १४४ लागू करण्यात येईल. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातही या काळात त्रिस्तरीय नाकाबंदी लावण्यात येणार आहे. त्यामुळे परवानगी नसलेल्या एकाही भाविकाला या काळात सोलापूर जिल्ह्यात प्रवेश मिळणार नाही. त्यामुळे यंदाही बहुतेक भाविकांना आषाढी एकादशीला विठ्ठलाचे थेट दर्शन घेता येणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या