
अमरावती : जिल्हयात आज ४५ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन आतापर्यत ९५ हजार १९५ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले. ९२ हजार ३७६ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन १ हजार २८९ रुग्णांवर रुग्णालयामध्ये अदयापही उपचार सुरू आहे. विशेष म्हणजे ४ रुग्णांचा आज मृत्यू झाला असुन जिल्हयात आतापर्यत कोरोनामुळे १ हजार ७0७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.जिल्हा प्रशासनाच्यावतीने संचारबंदीमध्ये आणखीन शिथीलता देण्यात आली असुन दुकानांची वेळ सायंकाळी ७ पर्यत करण्यात आली आहे. तर इतरही सुविधांमध्ये वेळ र्मयादा वाढविण्यात आली आहे. त्यामुळे शहरात नागरिकांची गजबज मोठया प्रमाणात वाढल्याचे दिसुन येत आहे. हळूहळू व्यवसायासह जनजिवन हे पूर्व पदावर येत असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंधन होत असतांना दिसुन येत आहे. त्यामुळे गेलेले दिवस पुन्हा अनुभवायचे नसेल तर नागरिकांनी नियम पाळणे अत्यवश्यक असुन त्याचे पालन झालेच पाहिजे असे अवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.मनपा प्रशासनाच्यावतीने नियम तोडणार्या नागरिकांवर वचक निर्माण करण्याचा प्रयत्न अदयापही सुरूच असुन व्हॅन च्यामध्यमातुन चाचणी घेण्याची प्रक्रिया देखिल सुरूच असल्याचे दिसुन येत आहे.कोरोना काळात अनेक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आल्यामुळे नागरिकांच्या आनंदात विर्जन पडल्यासारखे झाले होते. मात्र संचारबदीमध्ये शिथीलता दिल्यामुळे अनेकांच्या आनंदाला उधान आल्याचे चित्र जिल्हयात सर्वत्र पहावयास मिळत आहे. १५ जुन रोजी जिल्हयात ४५ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून ९५ हजार १९५ रुग्ण हे कोरोनाग्रस्त असल्याचे आकडेवारीवरून दिसुन येत आहे. महत्वाचे म्हणजे जिल्हयात ४ रुग्णांचा मृत्यू झाला असुन आतापर्यत जिल्हयात १ हजार ७0७ रुग्णांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे.९२ हजार ३७६ रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आले असले तरी १ हजार २८९ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेंटर येथे उपचार सरू आहे.
0 टिप्पण्या