
यवतमाळ : दिग्रस-दारव्हा-नेर मतदारसंघाचे आ. संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या ३0 जून रोजी विविध सामजिक उपक्रमांचे आयोजन शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आले आहे. यवतमाळसह दिग्रस, दारव्हा, नेर आणि जिल्ह्यात सर्वत्र रक्तदान, गरजूंना साहित्य वाटप, आरोग्य शिबिर आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राठोड हे सध्या ओबीसींसह विविध समाजघटकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र दौर्यावर आहेत. बुधवार, ३0 जून रोजी वाढदिवसानिमित्त ते यवतमाळात दाखल होणार असून शिवसेना व कार्यकर्त्यांच्या वतीने आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तसेच सकाळी ११ ते ४ वाजेपयर्ंत येथील विदर्भ हाऊसिंग सोसायटीतील जनसंपर्क कार्यालयात शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार असून, त्याच दिवशी सायंकाळी पुन्हा महाराष्ट्र दौर्यावर रवाना होणार आहेत, अशी माहिती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने देण्यात आली. दरम्यान करोना संसर्गाच्या अनुषंगाने नव्याने लागू करण्यात आलेल्या शासनाच्या सूचनांचे पालन करून, वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन संजय राठोड मित्रमंडळाच्या वतीने कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या