Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

हवालदाराने महिलेवर केला बलात्कार !

सुरत : गुजरातमधील सुरत येथील एका पोलीस हवालदाराने एका ३३ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप केला जात आहे. मास्क न घालता फिरत असल्याच्या कारणावरुन या हवालदाराने पीडित महिलेला ताब्यात घेतले होते. सुरत येथील उमरपाडा पोलीस स्थानकामध्ये हा हवालदार कार्यरत आहे. मास्क घातले नाही म्हणून कठोर कारवाई करेन अशी धमकी देत हवालदार मला त्याच्यासोबत पलसाना येथे घेऊन गेल्याचा आरोप या महिलेने केलाय. त्यानंतर या हवालदाराने तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर पुढे अनेक महिने तो माझ्यावर वारंवार बलात्कार करायचा, असा आरोप या महिलेने केलाय. एकीकडे या महिलेने हवालदारावर बलात्काराचा आरोप केलेला असतानाच दुसरीकडे या हवालदाराच्या पत्नीने पीडित महिला जातीवरुन आरोप करत असल्याचा दावा केलाय. ज्या पोलीस कर्मचार्‍यावर आरोप करण्यात आलेत त्याचं नाव नरेश कपाडिया असे आहे. नरेश यांच्या पत्नीने मात्र पीडित महिला आणि तिचा पती आमच्या घरी आले होते आणि त्यांनी आम्हाला जातीवाचक अपशब्द वापरत गोंधळ घातल्याचा आरोप केलाय. पीडितेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस हवालदाराच्या पत्नीनेही या महिलेविरोधात जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणामध्ये पीडितेविरोधातही मागास वर्गातील व्यक्तींला शिविगाळ केल्याच्या गुन्हाखाली तक्रार दाखल करुन घेतलीय. प्राथमिक तपासामध्ये आरोप करण्यात आलेल्या हवालदार आधी पलसाना पोलीस स्थानकामध्ये कार्यरत असल्याची माहिती मिळालीय.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code