Header Ads Widget

दोन स्वस्त धान्य दुकानाला लावले सील

समुद्रपूर : समुद्रपूर येथील दोन स्वस्त धान्य दुकानदारांकडून स्थानिक ग्राहकांनी धान्य मिळत नसल्याबाबतची तक्रार केली होती. या तक्रारीनुसार समद्रपूर येथील पुरवठा निरीक्षक यांनी दि. १४ जून रोजी दोन्ही दुकानाला भेट दिली. सदर दुकानाची तपासणी करुन लाभार्थ्याचे बयाण घेतल्यानंतर या दोन्ही दुकानात अनियमितता आढळून आली. त्यामुळे मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी व राहुल नेरा उत्पादक संस्था या दोन्ही दुकानांचे प्राधिकरपत्र पुढील आदेशापयर्ंत निलंबित करण्याचे आदेश तहसिलदार यांनी काढले आहे. राहूल नीरा उत्पादक संस्थेच्या दुकानात लाभार्थ्याना धान्यापासून वंचित ठेवल्याचे दिसून आले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेचे धान्य वाटप न करता प्रत्यक्ष शिल्लक साठा हा पुस्तकी शिल्लकीपेक्षा जास्तआढळून आला. तर मल्टीपर्पज को-ऑप. सोसायटी या ही दुकानात असाच प्रकार आढळून आला. पण यापूर्वीही या दोन्ही ही दुकानात योजनेमधील धान्याच्या वाटपात गेल्या अनेक महिन्यापासून घोळ असून याची चौकशी होणे गरजेचे आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी या दोन्ही दुकानाची चौकशी करुन कारवाई करणार का ? दोन्ही दुकानाच्या लाभार्थ्याना आकडा हा साडेपाच हजार आहे. त्यामुळे एवढय़ा मोठया लाभार्थ्यासोबत हा प्रकार झाल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी सखोल चौकशी करुन फौजदारी-कारवाई करावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या