Recent in Technology

Advertisement

Breaking News

लहान मुलांना ज्युस देताना काळजी घ्या

अमेरिकन अकॅडमी ऑफ पीडियाट्रिक्सच्या मते, १२ महिने म्हणजे एक वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना ज्युस अजिबात देऊ नये. कारण याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. एक वषार्नंतर मुलांना हळूहळू ज्युस देणं सुरू करावं. मात्र रेडिमेड ज्युस देऊ नये, तर घरच्या घरी फळांचा ज्युस तयार करून द्यावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. दिवसाला ६0 से १२0 मि.लीपेक्षा जास्त ज्युस देऊ नये. एफडीएच्या मते, मुलांना ज्युस उकळून देऊ नका, यामुळे त्यातील चांगल्या बॅक्टेरियांचा नाश होतो. लहान आहेत म्हणून मुलांना दुधाप्रमाणे बॉटलमधून ज्युस देऊ नका. तुम्ही त्यांना चमच्याने ज्युस पाजा किंवा कपातून ज्युस द्या.फळांपेक्षा भाज्यांचा रस द्या कारण फळं गोड असतात. रात्री झोपण्यापूर्वी मुलांना फ्रुट ज्युस बिलकुल देऊ नका. यामुळे पोट फुगणं, गॅस, अपचन अशा समस्या उद्भवू शकतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code