Header Ads Widget

गंगूबाई काठियावाडीचे शूटिंग पूर्ण

मुंबई: प्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. गंगूबाई काठियावाडी असे या आगामी चित्रपटाचे नाव आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली.अभिनेत्री आलिया भट्ट या चित्रपटात गंगूबाईंची भूमिका साकारणार आहे. लॉकडाउनमुळे या चित्रपटाचे काही शूटिंग राहिले होते. अनलॉकनंतर या चित्रपटाच्या उरलेल्या शूटिंगला सुरूवात करण्यात आली. ते आता पूर्ण झाले असून हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज झाला आहे. याबाबत अभिनेत्री आलिया भट्टने स्वत: ही माहिती दिली आहे. हे फोटो शेअर करताना आलियाने लिहिले, ८ डिसेंबर २0१९ रोजी आम्ही चित्रपटाचं शूटिंग सुरु केले आणि आता २ वर्षांनी आम्ही या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केले आहे. या चित्रपटाने दोन लॉकडाउन, दोन चक्रीवादळ आणि बर्‍याच समस्यांचा सामना केला आहे. पण तरी सुद्धा आम्ही हार मानली नाही. गंगूबाई काठियावाडी हे पात्रं संजय लीली भन्साळींना हुसैन झैदी यांच्या माफिया क्वीन्स ऑफ मुंबई या पुस्तकातून भेटले आहे. गंगूबाई कामाठीपुरात वेश्या व्यवसाय करत होत्या. मूळच्या गुजरातच्या असलेल्या गंगूबाईंनी अवघ्या १६ व्या वर्षी प्रेमात पडून विवाह केला आणि मुंबईत पळून आल्या. मात्र त्यांच्या पतीने त्यांना केवळ ५00 रुपयांसाठी वेश्या व्यवसायात ढकलले. अलिकडेच गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे चित्रीकरण पार पडले आहे. यावेळी संपूर्ण टीमने केक कापून आनंद साजरा केला. येत्या ३0 जुलैला गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या