Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

अमरावती मध्ये सारथीचे विभागीय प्रशिक्षण केंद्र होणार

अमरावती : छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास (सारथी) संस्था अंतर्गत गरीब, गरजू मराठा तरुणांना प्रशिक्षण व विकास योजनांचा लाभ देण्यासाठी तसेच विविध उपक्रम राबविण्यासाठी आवश्यक निधी देण्यासह सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या १९ जून २0२१ रोजी पुणे येथे झालेल्या बैठकीत केली. या अंतर्गत सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्यात येणार आहे. शासनस्तरावर मराठा समाजाच्या तरुणांचे शैक्षणिक व नोकरीसंदर्भात असलेले प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न होत असतांना अमरावती मध्ये सुद्धा सारथीचे विभागीय केंद्र सुरु करण्याची विनंतीपूर्वक मागणी आ. सुलभा खोडके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्या कडे पत्राद्वारे केली असता अजित पवार लगेच होकार दर्शवित अमरावतीत सारथीचे विभागीय प्रशिक्षण केंद्र सुरु करण्याचे मान्य केले आहे . याबद्दल आ. सुलभा खोडके यांनी नामदार अजित पवार यांचे आभार मानीत अभिनंदन केले आहे .राज्यातील मराठा समाज व कृषीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांचे सामाजिक-आर्थिक आणि शैक्षणिक विकास करण्यासाठी सारथी अर्थात छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेची स्थापना करण्यात आली . या समाज घटकांना संशोधन, प्रशिक्षण , शैक्षणिक सुविधा व वसतिगृहे आणि ग्रामीण जनतेस मार्गदर्शन आदी उपक्रम सारथी मार्फत राबविल्या जातात. मात्र गत काळात सारथीच्या अनेक योजना या निधी अभावी बंद झाल्याने सारथी संस्थेचे अनेक उपक्रम व प्रशिक्षणे प्रलंबित राहिले. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी पुढाकार घेऊन सारथी संस्थेला स्वायत्तता देण्याची घोषणा केली. तसेच राज्यात सारथी संस्थेचे आठ विभागीय कार्यालये व एक उपकेंद्र सुरु करण्याचे सुद्धा अजितदादांनी सांगितले . दरम्यान अमरावती मध्ये सुद्धा सारथीचे विभागीय केंद्र देण्यात यावे , अशी विनंतीपूर्वक मागणी अमरावतीच्या आ. सुलभा खोडके यांनी ना. अजित पवार यांच्याकडे केली . अजितदादा पवार यांनी अमरावतीत सारथीचे विभागीय केंद्र सुरु करण्याचे मान्य केले . तसेच यासंदर्भात विभागनिहाय कृती आराखडा तयार करावा व जलद कार्यवाही करण्याचे निर्देश देखील अजितदादांनी सारथी संस्थेच्या व्यवस्थापकीय संचालकांना दिले . यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचा विश्‍वास देखील ना. अजित यांनी व्यक्त केला. सारथी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेतलेल्या तरुणांना अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत सुरु असलेल्या व्याज परतावा योजनेत प्राधान्य दिले जाईल. प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन भवनमध्ये सारथींच्या प्रतिनिधींसाठी जागा देण्यात येणार असून तारादूत प्रकल्पही सुरु करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code