हे ! तथागथा
तू शांतीच्या दूता
मानव मुक्तिच्या लढ्याचा
तूच खरा एकमेव ऊद्गाता
तथागथा ! तुच तर दिली
ईथे,समता शांती,न्याय
अन,अवघी बंधूता,तुच तर दिली प्रथम स्ञियांना समानता संघात
दाखल होन्याची
कुठलाही भेद न दावता
तूच एकमेव खरा
शाक्य कोलिया यांच्या
पाणि युध्दातला मानबिंदू
तूच एकमेव झाला
विश्वव्यापी समतेचा जनक
कोटी कोटीचा झाला तू
आज एकमेव कनक
वर्णभेद देव थोतांड
कर्मकांड हे निष्फळ
बाबासाहेबांनी सोसली ही
सर्वहारा विषमतेची कळ
तुलाच मानिले रे ! त्यांनी
मानव शांतीदूता गुरूवर
अन्, दिला तुझा बुध्दधम्म
आज अजरामर जगात नांदे
ईथे प्रत्येक जण
आज वंदितो बुध्द वंदे
आज बुध्द वंदे
- शिवा प्रधान
अमरावती
.........................
0 टिप्पण्या