नवी दिल्ली : लसीकरणाविषयी नागरिकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरवू नका. तुम्हीही लस टोचून घ्या आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करा. प्रत्येकाने लवकरात लवकर लस घेऊन लसीकरणाच्या मोहिमेत योगदान द्यावे, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी मन की बातमधून देशवासीयांना केले. रविवारी मन की बातचा ७८ वा भाग होता.
यावेळी मध्य प्रदेशातील एका ग्रामस्थ राजेश हिरावे यांनी लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. व्हॉट्स अँपवर आलेल्या मेसेजमुळे आपण घाबरलो आणि लस घेतली नाही, असे ते म्हणाले. याला उत्तर पंतप्रधान मोदींनी नागरिकांमधील लसीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. नागरिकांमध्ये गैरसमज आणि अफवा पसरवू नका. या संदर्भात आपला आणि आपल्या आईचा अनुभव सांगितला. मी आणि माझ्या आईनेही कोरोनावरील लस घेतली आहे. यामुळे घाबरू नका. तुमच्या गावात ज्या काही अफवा पसरल्या आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही. आपल्या देशातील २0 कोटींहून अधिक नागरिकांनी कोरोनावरील लसीचे डोस घेतले आहेत. आपल्याला लसीकरणचा वेग वाढवायचा आहे. अफवांना बळी पडू नका, असेही मोदी म्हणाले.
लसीसाठी शास्त्रज्ञांचे मोठे प्रयत्न
कोरोनावरील लस घेण्यासाठी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. कोरोनावरील लस किती प्रभावी, हे नागरिकांना समजवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करा आणि लस घेतल्याने काहीही वाईट होत नाही. कोरोना विरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते, असेही पंतप्रधान म्हणाले.
0 टिप्पण्या