Header Ads Widget

कोरोना लसीकरणावर राजकारण बस झाले

लखनौ : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशात लसीकरण सुरू आहे. लसीकरण प्रक्रियेवर विरोधक सतत केंद्रावर टीका करत आहेत. १८ वर्षावरील सर्वांच्या मोफत लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने घेतली आहे. या पार्श्‍वभूमीवर बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी राजकारण आणि वादविवाद दूर करून कोरोना लसीकरणाचे फायदे सर्वसामान्यांपयर्ंत पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन केले आहे. मायावती यांनी ट्विट केले आहे, त्या म्हणाल्या कोरोना लस तयार करणे आणि नंतर लसीकरण इत्यादी संदर्भात वाद, राजकारण, आरोप आणि प्रति-आरोप इत्यादी पुरेसे झाले आहे. यामुळे लोकांना खूप त्रास होत आहे. परंतु आता लस वादाचा अंत करून, त्याचे फायदे लोकांपर्यंत पोहोचवावे. भारतासारख्या विस्तीर्ण ग्रामीण-बहुल देशात, कोरोना लसीकरण ही एक सार्वजनिक मोहीम बनविणे आवश्यक आहे आणि वैज्ञानिकांना योग्य पाठबळ व प्रोत्साहनाची कमतरता दूर करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, बसपा केंद्र व सर्व राज्य सरकारांकडे मागणी करीत आहे की, मूलभूत आरोग्य सेवा अधिक मजबूत करा. असे देखील मायावती म्हणाल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या