Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

जुलै-ऑगस्ट महिन्यात लसीकरणाला गती

अहमदाबाद : देशात जुलै - ऑगस्ट महिन्यापासून कोविड १९ विरुद्ध लसीकरणाला वेग मिळण्याची शक्यता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केलीय. गृहमंत्री सध्या दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. सोमवारी सकाळी अहमदाबादमध्ये एका लसीकरण केंद्राचा दौरा केल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बोलत होते. सोमवारी, अमित शहा यांनी गांधीनगरमधील राजभवनात राज्यपाल आचार्य देवव्रत यांचीही भेट घेतली. यावेळी, उपमुख्यमंत्री नितीन पटेल देखील उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याआधीच १८ वर्ष आणि त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींसाठी कोविड १९ लसीचे डोस मोफत उपलब्ध करण्याची घोषणा केलीय. सोबतच, देशातील सर्वांचं लसीकरण लवकरात लवकर पूर्ण व्हावे हे लक्ष्य वेगाने गाठण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. केंद्र सरकारने जुलै - ऑगस्ट महिन्यात कोविड १९ विरुद्ध लसीकरणाची गती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही अमित शहा यांनी यावेळी म्हटलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्राने कोविड १९ विरुद्ध लढाईचा महत्त्वपूर्ण प्रवास सुरू केला आहे. एवढय़ा प्रचंड लोकसंख्या असणार्‍या देशात सर्वांना मोफत लसीकरण उपलब्ध करून देणे हा एक मोठा निर्णय असल्याचे शहा यांनी म्हटलेय.आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने देशातील सर्वांना मोफत लस उपलब्ध करून देण्याची मोहीम सुरू करण्यात आलीय. लसीकरणाच्या बाबतीत भारत इतर देशांच्या तुलनेत खूपच पुढे आहे, असेही यावेळी गृहमंत्र्यांनी नमूद केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code