
राळेगांव : तालुक्यातील वाढोणा बाजार गावाजवळील एका शेतात छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर वडकी पोलिसांनी छापा टाकून तीन दुचाकी सह दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे.तर यातील मुख्य सुत्रधारांविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे.हि कारवाई २१ जुन २0२१ च्या रोजी सायंकाळी करण्यात आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून वडकी पोलीसांनी परीसरात कारवाईचा बडगा उगारला असल्याचे दिसून येत आहे.अशातच वाढोणा बाजार या गावाजवळील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाच्या मागे असलेल्या एका शेतात छुप्या पद्धतीने अवैध मटका घेतला जात असल्याच्या गोपनीय माहिती वरुन वडकी पोलिस स्टेशनचे ठाणेदार विनायक जाधव यांनी पथकासह छापा टाकला.यावेळी पोलिसांनी तीन दुचाकी अंदाजे किंमत ८0 हजार व मटका जुगारात वापरण्यात येणारे साहित्य ५ हजार ३९0रुपये असा एकूण ८५ हजार ३९0 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून निलेश कुळसंगे व गजानन धनवे दोघेही रा.राळेगांव या संशयितांना ताब्यात घेतले.दरम्यान मटका जुगार भरविणारा मुख्य सुत्रधार इमरान कुरेशी रा.राळेगांव यांचेसह या दोन्ही जणांविरुद्ध गुन्हा कायम करण्यात आला.हि कारवाई ठाणेदार विनायक जाधव, मंगेश भोंगाडे व सुरज चिव्हाणे यांनी पार पाडली.
0 टिप्पण्या