Header Ads Widget

पँथर (काल आणि आज )

पँथर 
वस्ती वस्तीतून 
गल्ली बोळातून 
हमरस्त्यावरून 
चौकाचौकातून 
फिरायचा बेदर्कारपणे 
पँथर
मुल्यांतर / नामांतर 
चर्चा / मोर्च्या / 
सभा / संमेलने  
धरणे / आंदोलने 
वादविवाद / परिसंवादातून 
पोट तिडकीने मांडायचा समस्या 
माणसांच्या जगण्या / मरणाच्या 
पँथर
दाखल व्हायचा क्षणात 
दंगलग्रस्त वस्तीत 
वस्तीतही उफाळून यायची मस्ती 
आणि…. 
गस्तीवर असलेली / खाकी चड्डी 
'दांडू ' हलवत निघून जायची मुक्याट्याने  

पँथर
दिसताच शेपूट घालायचं 
'गाय वासरू '…। 

पँथर 
आता दाखल झाला 
त्यांच्या 'सर्कसीत '
लाल दिव्याच्या गाडीवरील 
एका 'रोड-शो' साठी 
केलेल्या मेकअप मध्ये 
त्यांनी काढून घेतलीत 
त्याची नखे / बत्तीसी 

पँथर
आता असतो शांतता कमेटीवर/ 
रोजगार हमीवर / जिल्हा कचेरीवर /
एका काचोरीवर भागवतो आपली सांज 
फिरतो आर. टी. आय. च्या पुंगळ्या घेऊन 
चर्च्या करतो वांझ 

पँथर
आता रोजच असतो बार मध्ये 
'साहेबा' सोबत गोंडा घोळत…. 
कर्तुत्वाच गाठोड फेकून दिलं 
त्यानं गटारात लोळत…… 

- संजय घरडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या