का मानवा वृक्षाची बेसुमार कत्तल करतो
माय लेकराच्या नात्याची का दोर कापतो
एकमेकापासून त्यांना वेगळे का करीतो
काळजापासून काळजाची नाळ तोडतो
का हिरव्या जिंदगीला कसा आग लावतो
का स्वतःच स्वतःचा असा श्वास हिरावतो
संगोपण करणे होत नाही जयांचे जीवन
उधवस्त करण्यास का धजावते तुझे मन
जग आणि जगू दे त्या निष्पाप लेकरांना
मिळू दे आसरा त्या बेघर मुक्या पाखरांना
टांगले प्रश्न आहे मुक्यांचे आज आकाशाला
हाती कु-हाड घेऊन मागतो सावली झाडाला
- अरुण विघ्ने
(चित्र:मिलींद हिवराळे यांचे वाँलवरून)
0 टिप्पण्या