Header Ads Widget

पोलिसांकडून दुचाकी चोरीच्या रॅकेटचा पदार्फाश

चांदूरबाजार : जिल्ह्यात मागिल काही दिवसात दुचाकी चोरीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले. त्या अनुषंगाने ग्रामीण पोलिस अधीक्षक एन. हरी. बालाजी यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशनला या प्रकरणाचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रा. पो. अधीक्षक, पो. अ. श्याम घुगे व उपविभागीय पोलिस अधिकारी पोपटराव अब्दागिरे यांचे मार्गदर्शनाखाली चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगांव कसबा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाई तिन्ही पोलिस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी, मोटरसायकल चोरीच्या मोठय़ा रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिस प्रशासनाकडून प्राप्त माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहीतीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. या कारवाई चोरीचा एकूण २0 लाख ३0 हजारांचा, मुद्देमाल जप्त करण्यात आला.या मध्ये चोरीच्या २९ मोटरसायकलींचा समावेश आहे.मोटर सायकल चोरांची ही एक मोठी चेन असून,यात आणखी काही मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुचाकी चोरीच्या या रॅकेट कडून फक्त गाड्यांची चोरीच नव्हे, तर खोटी आर. सी. तयार करून चोरीच्या गाड्या विकल्या जात होत्या. यात पकडण्यात आलेल्या चोरट्यांमधील प्रत्येकाकडे वेगवेगळी जबाबदारी होती, असे त्यांच्या बयाणावरून स्पष्ट होते. गाडल्या चोरणारे, चोरलेली गाडी इतरस्त लपवून ठेवणारे, खोटी आर. सी. बनविणे,त्यानंतर या गाड्यांची विक्री करणे आदी जबाबदारी वेगवेगळे आरोपी पार पाडत होते. त्यामुळे यांचा तपास लावणे पोलिसांना अवघड जात होते. परंतु, तालुक्यातील तिनही गाण्यांनी ही कामगिरी बजावून, आपल्या वरिष्ठांनी सोपविलेली मोठी कामगिरी यशस्वी केली. जप्त केलेल्या मोटरसायकल मध्ये चांदूरबाजार, ब्राम्हणवाडा थडी, शिरजगाव कसबा, परतवाडा, मोर्शी, शिरखेड, अमरावती, बडनेरासह, यवतमाळ जिल्ह्यातील आदरणीय येथील मोटरसायकलींचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून,अधिकारी मोटरसायकल चोरीची प्रकरणे समोर येण्याची शक्यता आहे .या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये उज्ज्वल दिलीप बोराळे वय २२ रा. सोनोरी,पवन मनोहर वाहाने वय २५ रा.माधान, संकेतकिशोर मेर्शाम वय २१ रा.पिंपरी,नौशाद अली रहमान शाहवय २७ या.शिरजगांव बंड, देवानंद विजय नागापूरे वय२८ रा.हैदतपूर,अन्सार शहा दिलवर शहा वय २७ रा.शिरजगांव बंड, मन्सूर अली शहा वय २४ रा.शिरजगांव बंड आदींचा समावेश आहे. पोलिस प्रशासन या रॅकेटचा पुढील तपास करीत आहे. या रॅकेटचा पदार्फाश पो. नि. सुनिल किनगे,स. पो. नि. दिपक वळवी,स. पो.नि.पंकज दाभाडे, स.पो. नि. नरेंद्र पेन्दूर, पो.उ.नि. संजय शिंदे, राजेंद्र टेकाडे, दादाराव पंधरे, पोलीस हवालदार साहेबराव राजस, राजेंद्र शिंपी,किसन आपटे, विनोद इंगळे, मधुकर भाष्कर, सुरेश धाकडे, संजय मांडोकार,मालेंद्र रोडे,ना. पो.कां. दिनेश वानखेडे, कैलास खेडकर, प्रशांत भटकर, विरेंद्र अमृतकर,निकेश नशिबकर, भूषण पेठे, पुरूषोत्तम माकोडे, विजय अकोलकर, पो.कॉ.महेश काळे, महेंद्र राऊत, राहूल भोरे, नितिश वाघ, अंकुश अरबट,अभय हरदे, विनित क्षिरसागर यांनी केला.ज्यांच्या मोटरसायकल चोरी गेलेल्या आहेत,त्यांनी गाडीची ओळख पटवून देण्यासाठी,कागद पत्रासह पोलिसांशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या