
वर्धा : कामगार आणि त्यांच्या पाल्यांना देण्यात येणार्या विविध योजनांच्या लाभात कोट्यवधींचा घोळ झाला असल्याची तक्रार र्शमिक इमारत व बांधकाम कामगार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा अंबिका हिंगमीरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केल्यानंतर काल गुन्हे अन्वेषण शाखेच्या वतीने या प्रकरणातील मुख्य आरोपी पवनकुमार चव्हाण याला अटक केली होती.
त्यानंतर सेवानवृत्त नोंदणी अधिकारी गजानन कडू सह राणी दुर्गावती संघटनेच्या अध्यक्षा रजनी देहारे व सचिव राजू आडे यांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून कामगार कार्यालय व कामगार अधिकारी यांचे बनावट शिक्के जप्त केले आहेत. बनावट कामगार दाखवून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा उघड झाला आहे यामधील अजूनही काही अधिकारी बाहेर असल्याचा आरोप अंबिका हिंगमीरे यांनी केला असून त्यांनाही त्वरित अटक करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
कामगार अधिकारी राजदीप धुर्वे यांच्या कार्यकाळात सुद्धा जिल्ह्यात बोगस कामगार संघटना तयार करून त्यामार्फत अनधिकृत कामगारांना योजनेचे अनुदान दिले. यामध्ये प्रामाणिक काम करणारे खरे कामगार मात्र योजनेपासून वंचित आहेत. अधिकार्यांनी संगनमत करून या योजनेचा फायदा कामगार नसलेल्या लोकांना करून दिला. जिल्ह्यात शंभर कोटी रुपये वाटप करण्यात आले व त्यामध्ये कमिशन खोरी करून खुद्द अधिकार्यांनी देखील लाखो रुपये हडप केले असल्याचे समोर आले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने सर्व आरोपींची कसून चौकशी सुरू असून यामधून मोठे घबाड बाहेर निघण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अंबिका हिंगमीरे यांनी गत महिनाभरापासून सदर प्रकरणाच्या चौकशीची मागणी रेटून धरली होती. ज्यामध्ये अंशत: यश मिळाले आहे. अश्या बोगस अधिकारी आणि बोगस संघटनामुळे प्रामाणिक कामगारांचे प्रश्न मांडणार्या व त्यांच्या हक्कासाठी लढणार्या संघटनांचे भरपूर नुकसान होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी लक्ष वेधले असून लवकरच सर्व आरोपी जाळ्यात अडकणार आहेत. त्या ऑडिओ क्लिपची देखील होणार चौकशी एका संघटनेच्या पदाधिकार्याने एका महिला कर्मचार्याला सदर प्रकारणाबाबत कोणतेही बयाण ने देण्याबाबत दबावतंत्राचा वापर केला. सदर ऑडिओक्लिप चांगलीच व्हायरल झाली असून या ऑडिओक्लिप ची देखील चौकशी होणार असल्याचे समजते.
(Images Credit : Kamgar Nama)
0 टिप्पण्या