Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

कसा पावणार देव..…?

    बाप बोलता बोलता
    गेला नयन मिटून ।
    तुझ्या चेहऱ्याला वेड्या
    डोळ्यामध्ये साठवून ।।
    किती निर्लज्ज झालास
    किती झाला अपराधी ।
    तुझ्या बोलण्यामुळेच
    त्याला लागली समाधी ।।
    ओरडत गेला त्याला
    किती केली शिवीगाळ ।
    कसा पावणार देव?
    करुनिया जपमाळ ।।
    कोण बापाविना सांग
    तुझे लाड पुरविले? ।
    रानोवनी भटकून
    कोण तुला जगविले? ।।
    घाम गाळला बापाने
    तुझ्या सुखासाठी सदा ।
    तुला प्रिया बापापेक्षा
    आहे संपत्ती संपदा ।।
    किडे पडतील बघ
    तुझ्या तोंडात नक्कीच ।
    तुलासुद्धा बोलतील
    अरे लेकरे तुझीच ।।
    शब्दसखा-अजय रमेश चव्हाण,
    तरनोळी
      ता.दारव्हा, जि.यवतमाळ
      मो.८८०५८३६२०७

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code