मातृत्वाच्या पहिल्या वहिल्या विद्यालयात शिकलो
आयुष्याची पहिली कविता गर्भाशयात शिकलो
अनुभव मजला शिकवत गेले गुरुकिल्ली जगण्याची
पोटापुरते फक्त तेवढे ग्रंथालयात शिकलो
साधा भोळा होतो मी तर शहरामध्ये येण्यापूर्वी
याच्या त्याच्या कुरघोड्या मी कार्यालयात शिकलो
जरी ऐकले नाही माझे तिने तरीही आता
ना घाबरता खरे बोलणे मद्यालयात शिकलो
जशी वर्गणी तशी लागते रांग आपली येथे
दर्शन प्रकार वेगवेगळे देवालयात शिकलो
- प्रविण जगन्नाथ बोपुलकर
खेट्री, जि. अकोला
0 टिप्पण्या