
अमरावती: जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पहावयास मिळत असुन कोरोनामुळे मृत्यू होणार्यांची संख्या देखिल कमी जास्त होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. १९ जून रोजी जिल्ह्यात ९२ रुग्णांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार ५४६ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले आहे. ९२ हजार ९९८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असुन १ हजार ८ रुग्णांवर कोविड तसेच क्वारंटाईन सेटर येथे उपचार सुरू आहे. एका रुग्णाचा शनिवारी कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत जिल्ह्यात १ हजार ५४0 रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहे. जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शनिवार, रविवार वगळता इतर दिवशी बाजारामध्ये होत असलेली गर्दी ही मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे कोरोना रुग्णवाढीचा कमी झालेला आलेख हा गेल्या चार दिवसांपासून अधिक उंचावलेला दिसून येत आहे. तसेच लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमावरील निर्बंध देखिल कमी करण्यात आल्यामुळे त्या कार्यक्रमाचा देखिल धडाका पहावयास मिळत आहे. जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासन यांनी दिलेल्या आवाहनाचे वा निर्देशाचे पालन होत नसल्यामुळे कोरोनाची तिसरी लाट ही लवकरच आपल्याला अनुभवायला मिळणार यांची दाट शक्यता राज्यशासनाने वर्तविली आहे. जिल्ह्यात लसीकरणाला गती आली. ३0 ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात झाल्यामुळे तरूण वर्गामध्ये आनंदाचे वातावरण पहावयास मिळत आहे. १९ जून रोजी ९२ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळून आले. जिल्ह्यात आतापर्यंत ९५ हजार ५४६ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आहेत. तर ९२ हजार ९९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. १ हजार ८ रुग्ण हे अँक्टिव्ह असुन एका कोरोना रुग्णांच्या मृत्यूसह जिल्ह्यात १ हजार ५४0 रुग्णाचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे.
0 टिप्पण्या