पिंपळखुटा/स्वाती नरेश इंगळे
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला.या निमित्त ऑनलाइन आभासी चर्चासत्र घेण्यात आले.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.सुभाष मुरे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ.नरेश इंगळे डॉ.मेघा सावरकर उपस्थित होते या आभासी चर्चासत्रात उपस्थितांनी योगा अभ्यासाबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले तसेच विविध योगासनाचे प्रात्यक्षिक सादर केले. महाविद्यालयामध्ये प्राध्यापक व कर्मचारी यांनी विविध योगासने केलीत.तसेच महाविद्यालय बंद असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना आपल्या राहत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करण्याचे निर्देशित करतानाच दैनंदिन जीवनातही नियमितपणे योगासने करण्याचे आवाहन मान्यवरांनी केले.सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक प्रा.डॉ.नरेश इंगळे यांनी केले.कार्यक्रमाला प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
0 टिप्पण्या