नभ भरून आलं मन हर्षुन गेलं.
विपिन घालतं शीळं बेभान रानं होतं.
मेघ दाटूनिया आलं मृग ओसंडून वाहतं.
मातीच्या कणाकणात नवं सृजनत्व अंकुरतं.
चिंब भिजली धरं खग गातो गीतं.
दाहीदिशा उजाळलेल्या सप्तरंगाच्या कमानीतं.
टपोऱ्या थेंबाचा रवं पानावर पडतं.
लाडोर फुलवून पिसारं बनात नाचतं.
काळ्या आईच्या कुशीतं दाणा अलगत पेरतं.
काया झिजवून आपली जगाला अन्न देतं.
- संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००
0 टिप्पण्या