Recent in Technology

Advertisement

Breaking News

२४ तासानंतर रुग्णासह मृतकांमध्येही वाढ,९९ पॉझिटिव्ह

अमरावती : गेल्या चार दिवसापासुन कोरोनाग्रस्तांची सख्या कमी होत असतांना आज अचानक रुग्ण संख्ये मध्ये थेडया प्रमाणात वृध्दी पहावयास मिळाली. १६ जुन रोजी ९९ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन आतापर्यत जिल्हयात ९५ हजार २९४ रुग्ण हे कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत.मृत्यू आणि मृत्यू दर दोन्ही कमी असतांना अचानक दोन दिवसापासुन कोरोबाधित रुग्णांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ झाली असुन ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे जिल्हयात आतापर्यत १ हजार ५३४ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत. ९२ हजार ५८0 रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन १ हजार १८0 रुग्णांना रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. जिल्हयात लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर दैनंदिन गर्दीचा प्रवाह हा मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे कोरोना संक्रमनाचा धोका देखिल बळावल्याचे दिसुन येत आहे. दोन दिवसापासुन कमी असलेल्या रुग्ण संख्येमध्ये आज अचानक दुप्पटीने वाढ झाल्यामुळे जिल्हा प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या भौवया देखिल उचावल्याचे दिसुन येत आहे.महानगरपालिका प्रशासना कडून शक्य ते पर्य} केल्या जात असले तरी अनेक नागरिक हे अदयापही कोरोना चाचणी करून घेण्यास इच्छूक नसल्याचे दिसुन येते. जिल्हा प्रशासनाकडून मोठया प्रमाणात जनजागृती केल्या जात असतांना देखिल अनेक नागरिकांच्या मनातील भिती घालविण्यास प्रशासन अदयापही अपयशी ठरल्याचे दिसुन येत आहे.लॉकडाऊन शिथिल केल्यामुळे शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळत आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रास उल्लंधन हेातांना दिसुन येत आहे.१६ जुन रोजी जिल्हयात पुन्हा कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये वाढ झाल्याचे दिसुन आले. एकाच दिवशी तब्बल ९९ रुग्णाचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले असुन आतापर्यत जिल्हयात ९५ हजार २९४ कोरोनाग्रस्त आढळुन आले आहेत. ९२ हजार ५८0 रुग्णांना रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला असुन १ हजार १८0 रुग्णावर उपचार सुरू आहे. ४ रुग्णांचा मृत्यू झाला असुन आतापर्यत १ हजार ५३४ रुग्ण हे कोरोनामुळे दगावले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code