Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

एसटीची सेवा पूर्ववत

मुंबई : राज्यातील कोरोना संसर्ग ओसरत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर अनलॉक प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. त्यानुसार निबर्ंध विविध टप्प्यांमध्ये शिथिल केले जात आहेत. तर, जनजीवन सुरळीत करण्यासाठी देखील विविध सेवा हळूहळू पूर्ववत केल्या जात आहेत. याचाच एक भाग असलेला राज्याची परिवहन सेवा देखील आता सुरळीत होत आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अत्यावश्यक सेवेतील कर्मचार्‍यांसाठी वगळता एसटीची राज्यातील सेवा सर्वसामान्यांसाठी बंदच होती. मात्र आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाल्याने एस.टी. पुन:श्‍च एकदा हरी ओम करत आहे. सोमवारपासून सामान्यांसाठीही एसटीची सेवा पूर्ववत झाली आहे. या संदर्भात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाकडून एक ट्विट देखील करण्यात आले आहे. एस.टी.चा पुन:श्‍च हरी ओम. प्रवाशांच्या सेवेसाठी .. चला करू प्रवास आपल्या लाडक्या एस.टी. संग. सुरक्षित आणि किफायतशीर..! (स्थानिक जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमानुसार), असे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून ट्विट करण्यात आले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मास्क व निर्जंतुकीकरण याचे लोगे देखील दर्शवले आहेत. ई-पासशिवाय एसटी प्रवास काही जिल्ह्य़ात निबर्ंध शिथिल होत असल्याने एसटीने एका जिल्ह्य़ातून दुसर्‍या जिल्ह्य़ातही जाता येणे शक्य होणार आहे, अशी माहिती महामंडळाकडून देण्यात आली आहे. राज्याची पाच स्तरांमध्ये विभागणी करतानाच कोरोनाचे निर्बंध शिथिल केले आहेत. यात पहिल्या चारही स्तरांत मोडणार्‍या जिल्ह्य़ात प्रवास ई-पासशिवाय करता येणार आहे. दुसरी लाट सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्या ओसरू लागली. त्यातच टाळेबंदीचे नियम कठोर करतानाच प्रवासावरही निबर्ंध आले. एसटीची जिल्हा ते जिल्हा सेवा बंदच राहिली. तर अत्यावश्यक सेवा कर्मचार्‍यांसाठी एसटी चालवण्यात आल्या. परिणामी एसटीची प्रवासी संख्या व उत्पन्न कमी झाले. सध्या राज्यात एसटीतून दररोज १0 हजारच प्रवासी प्रवास करू लागले आणि ३0 ते ४0 लाख रुपये उत्पन्न मिळू लागले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code