Featured Post

Translate

Gaurav Prakashan

Recent in Technology

Advertisement

Breaking News

तिसरी लाट दुसर्‍याइतकी तीव्र राहणार नाही

नवी दिल्ली : भारतात कोरोनाची तिसरी लाट आल्यास ती दुसर्‍या लाटेइतकी तीव्र नसणार आहे, असा दावा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) नुकत्याच केलेल्या अभ्यासानुसार केला आहे. यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. इंडियन र्जनल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये (आयजेएमआर) प्रकाशित झालेल्या नव्या अभ्यासानुसार ही माहिती देण्यात आली आहे. गणिती मॉडेलच्या विेषणावर आधारित, या अभ्यासाचा अंदाज आहे की लसीकरणामुळे तिसर्‍या लाटेचा संभाव्य उद्रेक कमी होईल. या अभ्यासानंतर ४0 टक्के लोकांनी दुसर्‍या लाटेच्या तीन महिन्यांतच दोन्ही डोस घेतले होते त्यानुसार हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. लसीकरणामुळे करोना संक्रमणाची तीव्रती ही ६0 टक्कयांपयर्ंत कमी होण्याची शक्यता असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. लसीकरणामुळे संभाव्य तिसर्‍या लाटेचा धोका कमी होणार आहे, अशी माहिती यामध्ये देण्यात आली आहे. तिसर्‍या लाटेसंदर्भात चार गृहीतके विचारात घेता, अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की संसर्ग-आधारित प्रतिकारशक्ती कालांतराने कमी होऊ शकते. विषाणूमध्ये कोणताही बदल झाला नाही तर आधी करोनाची लागण झालेल्या लोकांना पुन्हा लागण होण्याची शक्यता आहे. तिसर्‍या लाटेत नवीन प्रकारचा विषाणूचा समावेश असू शकतो ज्यामुळे कोविड-१९चे मोठ्या प्रमाणात संक्रमण होऊ शकते. तसेच रोगप्रतिकारक शक्तीपासून वाचण्यासाठी हा विषाणू सक्षम आहे. यंत्रणेच्या अभ्यासात तिसर्‍या लाटेमध्ये विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी अत्यंत प्रभावी लॉकडाऊनची अंमलबजावणी करणे समाविष्ट आहे. तसेच वेगवान लसीकरणामुळे भविष्यातील लाटा रोखण्यात यश येऊ शकते असे सांगण्यात आले आहे. भविष्यातील संक्रमणाच्या लाटा टाळण्यासाठी तीन गोष्टींकडे महत्त्व देणे गरजेचे आहे. वैयक्तिक वर्तन आणि सामाजिक घटक : गर्दी, मास्कचा वापर आणि बोलताना शारीरिक राखणे अंतर हे सर्व मुख्य घटक आहेत ज्यामुळे करोना संक्रमणाचा दर आटोक्यात येऊ शकतो. मास्क वापर आणि शारीरिक अंतर यासारख्या इतर साध्या गोष्टींचा वापर न केल्यास पुढे येणार्‍या अनेक लाटांसाठी हे कारणीभूत ठरू शकते. आरोग्य यंत्रणा: कोणत्याही लॉकडाऊन आणि प्राथमिक उपायांचा प्रभाव हा आरोग्य प्रणालीवर गंभीरपणे अवलंबून असेल. जैविक घटक: विषाणूच्या संक्रमणाव्यतिरिक्त सार्स-कोव्ह -विषाणूची प्रतिकारशक्तीमुळे अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर लक्ष वेधले जाते. दरम्यान, पहिल्या लाटेच्या तुलनेत कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा भारतामध्ये जास्त प्रभाव जाणवला. अककटर प्रमुखांसह अनेक तज्ज्ञांनी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारतात करोना विषाणूची तिसरी लाट येऊ शकते असे म्हटले आहे. डेल्टा प्लस विषाणूमुळे ही लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code