Recent in Technology

Advertisement

Breaking News

भारतात डेल्टा प्लसचे ५0 रुग्ण; महाराष्ट्रात चिंतेत भर

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचे चित्र असले तरी कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे धास्ती वाढली आहे. मागच्या काही दिवसात देशात करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. देशातील १८ जिल्ह्यांमध्ये करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५0 रुग्ण समोर आले आहेत. करोना डेल्टा प्लस व्हेरिएंटची सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आढळून आल्याने चिंतेत भर पडली आहे. या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राचे संचालक डॉ सुजीत सिंह यांनी खबरदारीचा इशारा दिला आहे. त्यांनी देशातील ८ राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यामध्ये आंध्र प्रदेश, दिल्ली, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र, पंजाब, तेलंगणा आणि पश्‍चिम बंगाल ही राज्ये आहेत. या ठीकाणी ५0 टक्क्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्याचे त्यांनी सांगितले. डेल्टा व्हेरिएंट हा अल्फा व्हेरिएंटपेक्षा खूपच घातक आहे. या व्हेरिएंटला वैज्ञानिक भाषेत इ.१.१.७ असे नाव देण्यात आले असून सर्वात प्रथम इंग्लंडमध्ये आढळून आला होता असे एनसीडीसीचे संचालक डॉ. सुजीत सिंह यांनी सांगितले. महाराष्ट्रात आतापयर्ंत २0 जणांना डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाली आहे. मध्य प्रदेशात ७, पंजाब-गुजरातमध्ये २-२, केरळमध्ये ३, आंध्र प्रदेशमध्ये १, तामिळनाडुत ९, ओडिशात १, राजस्थानमध्ये १, जम्मू आणि कर्नाटकमध्ये १-१ रुग्ण आढळला आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांची वाढती संख्या पाहता प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे लवकर कोरोना व्हायरसची तिसरी लाट येईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

People

Ad Code