नवी दिल्ली:भारतीय स्टेट बँकेने आता एटीएम व्यवहारांवर शुल्क आकारण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खाते असलेल्या ग्राहकांना महिनाभरात चार एटीएम व्यवहार नि:शुल्क असून त्यावर झालेल्या प्रत्येक व्यवहावर बँकेकडून १५ रुपये शुल्क वसुली केली जाणार आहे. याशिवाय या खातेदारांना चेकसाठी देखील अतिरिक्त पैसे मोजावे लागतील. गुरुवार १ जुलै २0२१ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयामुळे बँकेच्या १२ कोटीहून अधिक बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदारांना झळ बसणार आहे.
बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यांवर सुधारित शुल्क आकारण्याचा एसबीआयने निर्णय घेतला आहे. त्यानुसार बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदारांना दर महिन्याला चार एटीएम व्यवहार नि:शुल्क असतील. त्यानंतर एटीएम व्यवहार झाल्यास त्यावर १५ रुपये अधिक जीएसटी असा सेवा शुल्काचा भुदर्ंड सोसावा लागणार आहे.
एसबीआय किंवा इतर कोणत्याही एटीएमवर बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारांना चार वेळा नि:शुल्क व्यवहार करता येतील. त्यापुढील प्रत्येक व्यवहारावर १५ रुपये अधिक जीएसटी असे सेवा शुल्क आकारले जाणार आहे. यात बँकेच्या शाखेत नॉन फायनान्शिअल ट्रान्झ्ॉक्शन निशुल्क असतील, असे बँकेने स्पष्ट केले आहे.
आयआयटी मुंबईच्या अभ्यासानुसार एसबीआयचे देशभरात १२ कोटींहून अधिक बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेदार आहेत. २0१५-२0२0 या वर्षात बँकेने सेवा शुल्कातून ३00 कोटींची अतिरिक्त कमाई केली होती. या दरवाढीनंतर बँकेच्या महसुलात देखील वाढ अपेक्षित आहे.
१२ कोटी खातेदारांना बसणार झळ
Contents hide