• Fri. Jun 9th, 2023

हिरव्या स्वप्नासाठी जगाचा पोशिंदा ‘अनलॉक’

मारेगाव : दमदार पावसाने मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यामुळे काळ्या माती मधुन हिरवे स्वप्न साकार करणारा जगाचा पोशिंदा जिवाची पर्वा न करता टोबणीसाठी अनलाँक झाला आहे.
तालुक्यातील शेतकर्‍यांचे जीवनमान कोरडवाहू शेतीवर अवलंबून आहे. कोरडवाहू शेतकर्‍यांचा खरीप हंगाम हा रोहीणी नक्षत्रा पासुन प्रामुख्याने सुरू होतो आहे. या नक्षत्रात काही शेतकरी धुळपेरणी करतात. धुळपेरणीमुळे टोबलेली बियाणे मृगाच्या पहिल्याच पावसात अंकुरतात.अर्ली उत्पादनामुळे बोंडअळी, लाल्या, मर रोगाचा पादुर्भाव रोखता येतो.असा काही शेतकर्‍यांचा समज आहे.यासाठी बाजारात अर्ली पिकांची वाण उपलब्ध असुन हा खरीप हंगाम वाया जाऊ नये यासाठी शेतकर्‍यांचा दरवर्षी आटापिटा चालु आहे. मात्र निसर्गाच्या अवक्रुपेने अनेकदा धुळपेरणी वाया गेली, दुबार पेरणी, तिबार पेरणीचे संकट ओढवले होते. अनेकांनी आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेवुन आपली जिवण यात्रा थांबवावी लागली. ही पाळी येवु नये म्हणून बहुतेक शेतकर्‍यांनी अशा पारंपरिक पद्धतीला फाटा देत शेती व्यवसायात बदल केला आहे.
रोहिणी नक्षत्रात बरसलेल्या पावसामुळे अनावश्यक कचरा अंकुरतात या कालावधीत अंकुरलेला हा कचरा नष्ट करुन बियाणाची पेरणी करणे शेती पिकांसाठी सोयीचे ठरते. त्यामुळे रोहणी नक्षत्रात धुळपेरणी ऐवजी आता शेतजमीन भुसभुशीत करुन पेरणी योग्य शेतजमीन तयार केली जात असुन म्रुगाच्या पावसाला महत्त्व दिले जात आहे.यंदा मृग नक्षत्राची सुरुवात दमदार पावसाने झाली आहे. ८ जुन पासुन म्रुग नक्षत्र सुरू झाले आहे. ६ जुनच्या रात्री पाऊस बरसला, ७ तारखेच्या दुपारी २ वाजता तर ८ जुनच्या सायंकाळी बरसला असुन म्रुगाचे आगमन दमदार पावसाने झाल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उत्पन्न वाढीसाठी खरीप हंगामात कोरडवाहू शेतकरी नक्षत्राला महत्त्व देत मृगाचा पावसाची प्रतिक्षा करत असतात यंदाचा पाऊस दिलासादायक ठरु पाहात आहे. अजूनपयर्ंत मान्सून सक्रिय झाले नसले तरी मान्सून सारखेच वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी मृगात टोबणीला सुरुवात केली आहे.यंदा ४४५00 हेक्टर शेतजमीन खरीप हंगामाच्या लागवडीसाठी तयार करण्यात आली आहे. या मध्ये ३१७0६ हेक्टर मध्ये कपास, ५९१३ सोयाबीन तर १२२ हेक्टर मध्ये पालेभाज्या लागवड करण्यात येणार आहे.आकाशात ढगाळी वातावरण आहे. थंडावा पसरला असला तरी अधूनमधून उन्हाची दाहकता जिवाची लाही लाही करत आहे.मात्र काळ्या मातीत हिरवे स्वप्ने पाहणारा हा जगाचा पोशिंदा जिवाची पर्वा न करता लढण्यासाठी अनलाँक झाला आहे.

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *