• Tue. Sep 26th, 2023

स्त्रीमुक्ति

चूल फुकता फुकता
वाहे डोयातून पाणी
नको सांगू बाई आता
तुहया जीवाची कहानी !
सुख आणि दुःख
खेळ उन्ह सावलीचा
चाले हासत सोसत
गाडा तुहया संसाराचा !
नको झाकू तोंड
बाई फाटकया पदरात
सुख उदयाचे अंकुरे
बाई तुझ्या उदरात !
दोरी सुटेना हाताची
बाई शिकुन सवरुन
वांझ स्त्रिमुक्तीच्या रे बाता
कर संसार सुखान !
घेई जन्म तुहया पोटी
दुनियाच नात गोत
धन्य धन्य बाई तुही
जिन जगण्याची रीत !
सती माता पतिव्रता
ठाव लागेना मनाचा
सात जन्मासाठी बाई
साथ मागते पतिचा
हात मागते पतिचा !
 वासुदेव महादेवराव खोपडे
 सहा पोलीस उपनिरीक्षक (सेनी)
 अकोला 9923488556

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,