• Mon. May 29th, 2023

सोशल मीडिया आणि महिला

आपण बघतोच आहोत आधुनिक काळात सोशल मीडियाला जास्त महत्त्व दिल्या जाते.पत्येक जण छोटीशी गोष्ट असली तरी प्रसिध्दी साठी सोशल मीडिया नेटवर्कची मदत घेत असतात. नाव कमावतात काही दिवस तीच ती चर्चा सुरू असते. नंतर अचानक शांत होते. त्याला ना बुड ना शेंडा , ना रंग ना ढंग असतो. बरेच दा पुरुष सुध्दा सोशल मिडीयावर यायला कचरतात. पण महिला मात्र बेधडकपणे आपली मते मांडत असतात. मोकळेपणाने चर्चा करत असतात.वादविवाद चर्चेत सहभागी होतांना अभ्यास पुर्ण माहिती देत असतात.आपल्या आयुष्यातील एखादा प्रसंग शेअर करण्या सोबतच वर्ज्य
समजल्या जाणाऱ्या विषयांत सुध्दा त्या सढळ मनाने लक्ष देतात. त्याच प्रमाणे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला देखील कौटुंबिक जवाबदारी सांभाळून समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करणा-या महिला आपल्या अवतीभवती आढळतात.शिक्षणच नव्हे तर त्यांच्यातला आत्मविश्वास, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत.
महिला या शब्दाचा अर्थ एकेकाळी दुबळेपणा असा होता.पण आज महिलांनी त्या दुबळेपणाला ठोकरून लावले आहे. असे त्यांच्या आत्मभानातून वागण्यातून दिसून येते. महिलांचा सोशल पणा मिडीया व्दारे अधिकाधिक वाढत चालला आहे.पुर्वी घरातील गोष्ट बाहेर जात नव्हती चार भिंतींच्या आत राहायची प्रथा होती.पण आता बेधडकपणे गोष्टी बाहेर हवेत पसरतात. अगदी महिलांच्या नैसर्गिक, प्राकृतिक, व्यवहारीक, ज्ञान विज्ञान, तंत्रज्ञान, अत्याचार, भ्रष्टाचार, बलात्कार, विनयभंग, छेडछाड, हिंसाचार, हुंडाबळी ह्या सगळ्या दृश्यांचा महिलांना आज सामना करावा लागतो. सोशल मीडिया इंटरनेटचा वापर करून महिलांची बदनामी करण्याचे प्रकार सुध्दा बघायला मिळतात महिलांना टार्गेट करुन शाळा, महाविद्यालयात प्रेमभंग, बनावट मोबाईल नंबरने फसवा फसवी, अश्लील प्रकार घडतात.यांत महिलांची बदनामी पण होते.पण महिला विषयाला वाचा फोडून आपल्या पदरात नव्हे आता जिन्सच्या खिशात योग्य तो न्याय मिळवून घेतला आहे. सोशल मीडिया एक महिलांसाठी साधन झाले आहे.

  अत्याचार कां सहन करावा
  नारी नाही चिंगारी आहे
  जुन्या काळी सहन केले
  आता सोबत मिडीया आहे !!
  -हर्षा वाघमारे
  नागपूर

gauravprakashan1@gmail.com

Maharashtra News, Braking News, Marathi News, Most Popular Marathi News, Latest Marathi News,Today News,Marathi Article, Marathi Poem, Marathi Story,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *